यंदाची निवडणूक लढणार नाही – शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे शरद पवार निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळालाय. मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत शरद पवार यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेसकडे सध्या दुसरं भक्कम नेतृत्त्व नसल्यामुळे खुद्द शरद पवारांनीच पुण्यातून निवडणूक लढवावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची इच्छा […]

यंदाची निवडणूक लढणार नाही – शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे शरद पवार निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळालाय.

मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत शरद पवार यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेसकडे सध्या दुसरं भक्कम नेतृत्त्व नसल्यामुळे खुद्द शरद पवारांनीच पुण्यातून निवडणूक लढवावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची इच्छा होती, असं सूतोवाच राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केले. राष्ट्रवादीने पुणे, औरंगाबाद आणि हतकणंगले या मतदार संघांसह राज्यातील २५ जागांवर दावा सांगितला आहे. परंतु परभणी आणि अमरावती या जागांची अदलाबदल करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत खासदार शरद पवारांनी पुण्यातून निवडणूक लढविण्याचा आग्रह पक्षातील नेत्यांनी केला. तर ऐनवेळेस पवार साहेब होकार देतील असे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हटले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number