जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मामाच्या गावाची ओढ ही सर्वांनाचं असते हीच मामाच्या गावची ओढ लागलीये ती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना.
पन्हाळा तालुक्यातील गोळीवडे गाव हे शरद पवारांचे आजोळ. 10 जानेवारीला शरद पवार आपल्या आजोळच्या गावी भेट देणार आहेत.
खुद्द शरद पवार गोळीवडे गावात येणार असल्याने गावकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहोचलाय. आता शरद पवार खुद्द गावाला भेट देणार असल्याने जुन्या नात्याला उजाळा तर मिळणार हे नक्कीचं. पण व्यक्ती कितीही मोठी झाली तरी मामाचा गाव त्याला प्रिय असतो याचीही प्रचिती यानिमित्तानं येणारये.