विचारवंतांवरील हल्ले म्हणजे सेक्युलरिझमवर हल्ला – शरद पवार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत पवार यांनी गौरी लंकेश, डॉ दाभोलकर हत्या प्रकरणावर भाष्य केलं. या हत्या प्रकरणात रोज वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. अशा विचारवंतांच्या हत्या म्हणजे सेक्युलरिझमवर हल्ला असल्याची टीका पवार यांनी केली. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजप पुन्हा सत्तेत येणार […]

विचारवंतांवरील हल्ले म्हणजे सेक्युलरिझमवर हल्ला – शरद पवार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत पवार यांनी गौरी लंकेश, डॉ दाभोलकर हत्या प्रकरणावर भाष्य केलं. या हत्या प्रकरणात रोज वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. अशा विचारवंतांच्या हत्या म्हणजे सेक्युलरिझमवर हल्ला असल्याची टीका पवार यांनी केली.

यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजप पुन्हा सत्तेत येणार नाही, असं भाकीतही केलं. मात्र २०१९ मध्ये कोण पंतप्रधान होईल, या प्रश्नावर मात्र पवार यांनी ज्या पक्षाचे जास्त खासदार निवडून येतील, त्यांचाच पंतप्रधान होईल अशा शब्दांत उत्तर दिलं. तसंच जनता सुज्ञ आहे. जनताच ठरवेल कोणी पंतप्रधान व्हावं असंही उत्तर पवार यांनी यावेळी दिलं.

 

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात –

  • सचिन अंदुरेनी स्वत: दिली हत्येची कबुली
  • हत्येदरम्यान मोटारसायकलचा वापर नाही
  • दोघांनी दाभोलकरांवर 2 राऊंड फायर केले
  • दोघांकडे एकूण 3 रिवॉल्व्हर होत्या
  • फायरिंगनंतर पळ काढण्यासाठी मोटारसायकल तयार होती
  • हत्येनंतर दोघेही मोटरसायकलवरून पळाले
  • सीबीआयच्या चौकशीत सचिन अंदुरेनी दिली माहिती
  • सीबीआयच्या सूत्रांकडून मिळाली माहिती
  • डॉ. दाभोलकरहत्याप्रकरणी सचिन अंदुरेची आज कोर्टाची सुनावणी पार पडली
  • दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे
  • सचिन अणदुरेला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे
  • शिवाजीनगर कोर्टाने सचिन अंदुरेला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number