पवारांनी निवृत्त व्हावे, उद्योगपती पूनावालांचा सल्ला

पुणे, ३० ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : शरद पवार यांना पंतप्रधान होण्याची संधी किमान दोन वेळा होती. पण दोन्ही वेळा ती संधी हुकली. आता त्यांचे वय झाले आहे. या वयात ते पंतप्रधान होणे कठीण वाटते. यामुळे वयाचा विचार करून शरद पवार यांनी निवृत्त व्हावे, असा सल्ला उद्योगपती सायरस पूनावाला यांनी दिला. कोरोना प्रतिबंधक लस तयार करणाऱ्या […]

पवारांनी निवृत्त व्हावे, उद्योगपती पूनावालांचा सल्ला

पुणे, ३० ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : शरद पवार यांना पंतप्रधान होण्याची संधी किमान दोन वेळा होती. पण दोन्ही वेळा ती संधी हुकली. आता त्यांचे वय झाले आहे. या वयात ते पंतप्रधान होणे कठीण वाटते. यामुळे वयाचा विचार करून शरद पवार यांनी निवृत्त व्हावे, असा सल्ला उद्योगपती सायरस पूनावाला यांनी दिला.

कोरोना प्रतिबंधक लस तयार करणाऱ्या सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सायरस पूनावाला यांनी शरद पवारांना निवृत्त होण्याचा सल्ला दिला. शरद पवार हुशार आहेत. त्यांना पंतप्रधान होण्याची संधी किमान दोन वेळा होती. पण दोन्ही वेळा ती संधी हुकली. आता पुन्हा संधी मिळणे कठीण वाटते. यामुळे वयाचा विचार करून शरद पवार यांनी निवृत्त व्हावे असे सायरस पूनावाला म्हणाले.

सुप्रिया सुळेंनी अभिजित पाटील यांना बांधली राखी

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर २०२४ ची विधानसभेची निवडणूक लढवतील, अशी चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी अभिजीत पाटील यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले आहेत. यानंतर पवार आणि पाटील यांचे संबंध दृढ होण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी खासदार सुप्रिया सुळे यांनी अभिजित पाटील यांना राखी बांधली. यामुळे अभिजीत पाटील यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळणार ही चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे. सोलापूर जिल्ह्यातील ताई गटाची जबाबदारी अभिजित पाटील यांच्यावर सोपवली जाणार या चर्चेलाही उधाण आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जुलै महिन्यात फूट पडली. अजित पवार समर्थक गटाने शिंदे सरकारला समर्थन दिले तर सुप्रिया सुळे गट मोदी विरोधी गटासोबत दिसत आहे.

मलेरिया आणि डेंग्यूची लस

सिरम कंपनी लवकरच मलेरिया आणि डेंग्यू प्रतिबंधक लस विकसित करणार असल्याचे सायरस पूनावाला यांनी सांगितले. चांद्रयान – ३ च्या यशासाठी पूनावाला यांनी इसरोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number