शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यभर एकच खळबळ उडाली आहे. शरद पवारांनी राजीनामा न देण्याची मागणी कार्यकर्ते, नेत्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी नेमण्यात आलेल्या निवड समितीची बैठक पार पडत आहे. या बैठकीत लोकसभेपर्यंत शरद पवारांनीच राष्ट्रवादीचं नेतृत्व करावं, असा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शरद पवारांनी अध्यक्षपदी रहावं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली दुसरं एखादं पद असावं यावर समितीच्या नेत्यांचं एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याचं दिसून येतंय. त्याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी नेमण्यात आलेल्या निवड समितीची बैठक होणार आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत शरद पवारांनी पक्षाचे नेतृत्व करावे असा ठराव आज होणाऱ्या बैठकीत येण्याची शक्यता असल्याची माहिती आहे.
प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के.के. शर्मा, पी.सी. चाको
अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ
दिलीप वळसे पाटील, फौजिया खान,धीरज शर्मा, सोनिया दूहन
अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड तसेच नरहरी झिरवळ, यांचा समावेश आहे.