जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी मी 71 हजार कोटी रुपयांचे कर्जमाफ केले होते. परंतु सध्याच्या सरकारातील निर्णय घेणारे लोक हे देशातील 18 ते 20 टक्के शेतकऱ्यांचा विचार करीत नाही.
शेतमालाला एक तर किंमत द्या किंवा कर्जमाफी, अशी थेट भावना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केली. तसेच संसदेत महाराष्ट्राचे संख्याबळ वाढवू न शकल्याने देशाचे सर्वोच्च पद मिळवण्याचा विचार आपण डोक्यातून काढून टाकला. देशात एकपक्षीय लोकशाही घातक असून, काँग्रेसने पर्याय देण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.