जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
ऊस तोडणी वाहतुकीचा खर्च हा अंतरानुसार करण्याचा सरकारचा निर्णय साखर कारखान्यांसाठी न्याय्य नसेल. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करावा अशी सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलीय.
तसंच पुढील वर्ष साखर उद्योगासाठी अडचणीचे ठरणाराय. त्यामुळे साखर कारखान्यांनी आतापासूनच गळीत हंगामाची आखणी करावी असा सल्लाही शरद पवार यांनी दिलाय.
तर, सध्याच्या केंद्र आणि राज्य सरकारची भूमिका साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मदत न करण्याची आहे अशी टीकाही पवार यांनी केलीय.