शरद पवार उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर

मुंबई, ७ जुलै २०२३, प्रतिनिधी: सध्या राजकीय पक्षांमध्ये वेगवेगळ्या सभांचे आयोजन सुरु आहे. एकीकडे शुक्रवारी (दि. ७ जुलै ) भाजपाच्या आमदारांची मनधरणी करण्यासाठी मुंबई चर्चगेट येथे भाजपाच्या अध्यक्ष्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन केले आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यात बैठक घेणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे. शरद पवार शनिवारपासून तीन दिवसीय […]

शरद पवार उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर

मुंबई, ७ जुलै २०२३, प्रतिनिधी: सध्या राजकीय पक्षांमध्ये वेगवेगळ्या सभांचे आयोजन सुरु आहे. एकीकडे शुक्रवारी (दि. ७ जुलै ) भाजपाच्या आमदारांची मनधरणी करण्यासाठी मुंबई चर्चगेट येथे भाजपाच्या अध्यक्ष्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन केले आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यात बैठक घेणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे.

शरद पवार शनिवारपासून तीन दिवसीय उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार आहेत. या तीनही दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी पवारांनी बैठकीचे आयोजन केले आहे. शनिवारी (दि. ८ जुलै) येवल्यात, रविवारी (दि.९ जुलै) धुळ्यात आणि सोमवारी (दि. १० जुलै) जळगावमध्ये पवारांची सभा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार आहेत. या तीनही बैठकांमध्ये मुख्य म्हणजे छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार सभा घेणार आहेत. शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले छगन भुजबळ देखील अजित पवार गटात गेल्याने नाशिकमध्ये शरद पवार काय बोलणार? सभेनंतर राजकारण पुन्हा काही नवीन वळण घेणार का? असे प्रश्न सगळ्यांनाच पडले आहेत. येवल्यानंतर पवारांचा धुळे आणि जळगाव दौरा होणार आहे.

सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्शवभूमीला लक्षात घेता आता पवारांचा हा उत्तर महाराष्ट्र दौरा आता राजकारणात नेमके काय वळण घेईल याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number