शरद पवार दुष्काळाचे राजकारण करत आहेत – चंद्रकांत पाटील

शरद पवार माहिती न घेता दुष्काळाचे राजकारण करत असल्याची टीका महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. सरकराने ऑक्टोबर महिन्यापासून दुष्काळासाठी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. पवार माहिती न घेता बोलत असल्यामुळे चिंता होत असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. शरद पवार यांनी दुष्काळी उपाययोजनाबाबत सरकारवर टीका केली होती. यामुळे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर […]

शरद पवार दुष्काळाचे राजकारण करत आहेत – चंद्रकांत पाटील

शरद पवार माहिती न घेता दुष्काळाचे राजकारण करत असल्याची टीका महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. सरकराने ऑक्टोबर महिन्यापासून दुष्काळासाठी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. पवार माहिती न घेता बोलत असल्यामुळे चिंता होत असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. शरद पवार यांनी दुष्काळी उपाययोजनाबाबत सरकारवर टीका केली होती. यामुळे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील ?

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांनी  सरकारवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

शरद पवार माहिती न घेता दुष्काळाचे राजकारण करत आहेत.

तसेच माहिती न घेता बोलत असल्यामुळे त्यांची चिंता वाटत असल्याचेही स्पष्ट केले आहे.

सगळ्यांनी मिळून दुष्काळाचा सामना करण्याची गरज असून शरद पवारांच्या सुचनेचे पालन केले जाईल असेही त्यांनी म्हटलं आहे.

त्याचबरोबर चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून राज ठाकरेंवर टीका केल्यामुळे व्यक्तीला मारहाण करण्यात आली. ही पद्धत चुकीची असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

तसेच बाळासाहेबांचा आदर्श घेऊन चालणारे राज ठाकरे कॉंग्रेसच्या बाजूने जात आहेत.

बाळासाहेबांनी कधीही कॉंग्रेसला मदत केली नसल्याने राज ठाकरे का जात आहेत ? असा प्रश्न उपस्थित केला.

 

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number