बंडानंतर शरद पवार मैदानात

मुंबई , ८ जुलै २०२३, प्रतिनिधी : अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यामुळे पक्षात उभी फूट पडली आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या आठ बड्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाची सर्व सुत्रे आपल्या हातात घेतली आहेत. त्यांनी पक्षात उद्भवलेल्या बंडाच्या दुसऱ्याच दिवशी कराडमध्ये जाऊन जोरदार शक्तिप्रदर्शन केले […]

बंडानंतर शरद पवार मैदानात

मुंबई , ८ जुलै २०२३, प्रतिनिधी : अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यामुळे पक्षात उभी फूट पडली आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या आठ बड्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाची सर्व सुत्रे आपल्या हातात घेतली आहेत. त्यांनी पक्षात उद्भवलेल्या बंडाच्या दुसऱ्याच दिवशी कराडमध्ये जाऊन जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. तिथेच त्यांनी आपल्या महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली होती. आजपासून शरद पवारयांच्या राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात झाली आहे.

शरद पवार हे आज छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमधील येवल्यात आपली पहिली सभा घेणार आहेत. राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. या सभेत शरद पवार नेमके काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. शरद पवार यांचे निकटवर्तीय अशी भुजबळांची ओळख होती. मात्र छगन भुजबळही अजित पवार यांच्यासोबत पवारांची साथ सोडून मंत्रिमंडळात सहभागी झाले आहेत.

या सभेबाबत शरद पवारांचे खंदे समर्थक राष्ट्रवादीचे नेते माणिकराव शिंदे यांनी माहिती दिली आहे. यावेळी बोलतान ते म्हणाले की, येवल्यामध्ये आज शरद पवार यांची ऐतिहासिक अशी सभा होणार आहे. या सभेला मोठ्यासंख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. कोणी कितीही दबाव आणला तरी जनता शरद पवारांसोबतच राहणार असल्याचा विश्वास माणिकराव शिंदे यांनी व्यक्त केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number