जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी नागपुरात सरकारला खडे बोल सुनावलेयेत.
बंदी असलेली कीटकनाशकं बाजारात आल्याने शेतकऱ्यांचे बळी गेल्याचे पवार म्हणालेत.
कीटकनाशक फवारणीमुळे झालेल्या मृत्यूंना कृषी मंत्रालय दोषी असल्याचंही शरद पवारांनी सांगितलंय.
तर, कर्जमाफी संदर्भात सरकारला 10 ते15 दिवस वेळ देऊ त्या नंतर त्या संदर्भातील राष्ट्रवादीची दिशा ठरवली जाणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलंय.