Homeमहाराष्ट्र मी मंत्री असताना कधी अशी समस्या नव्हती – शरद पवार
मी मंत्री असताना कधी अशी समस्या नव्हती – शरद पवार
जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक नागपुरात शरद पवारांनी सरकारला खडे बोल सुनावले आहेत. बंदी असलेली कीटकनाशकं बाजारात आल्याने अनेक शेतकऱ्यांचे बळी गेले आहेत असे शरद पवार यावेळी म्हणाले. कीटकनाशक फवारणीमुळे झालेल्या मृत्यूंना कृषी मंत्रालय दोषी असल्याचंही शरद पवारांनी म्हटलंय. तर कर्जमाफी संदर्भात सरकारला 10 ते15 दिवस वेळ देऊ त्या नंतर त्या संदर्भातील राष्ट्रवादीची दिशा ठरवली जाणार […]
नागपुरात शरद पवारांनी सरकारला खडे बोल सुनावले आहेत. बंदी असलेली कीटकनाशकं बाजारात आल्याने अनेक शेतकऱ्यांचे बळी गेले आहेत असे शरद पवार यावेळी म्हणाले.
कीटकनाशक फवारणीमुळे झालेल्या मृत्यूंना कृषी मंत्रालय दोषी असल्याचंही शरद पवारांनी म्हटलंय. तर कर्जमाफी संदर्भात सरकारला 10 ते15 दिवस वेळ देऊ त्या नंतर त्या संदर्भातील राष्ट्रवादीची दिशा ठरवली जाणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलं.