मामाच्या गावची पोरगी करायचं राहून गेलं खरं; शरद पवारांच्या मनातल्या भावना आल्या ओठांवर

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे   राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या ममाच्या गावाला भेट दिलीय. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील गोलीवडे हे पवार यांचं मामाचं गाव. शरद पवार हे सध्या कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि पवारांनी बऱ्याच वर्षानंतर आज मामाच्या गावाला भेट दिलीय. इतका मोठा नेता आपल्या गावात येतोय म्हटल्यावर गावकऱ्यांनी पवार यांचे जल्लोषात स्वागत केलं. […]

मामाच्या गावची पोरगी करायचं राहून गेलं खरं; शरद पवारांच्या मनातल्या भावना आल्या ओठांवर

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या ममाच्या गावाला भेट दिलीय. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील गोलीवडे हे पवार यांचं मामाचं गाव.

शरद पवार हे सध्या कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि पवारांनी बऱ्याच वर्षानंतर आज मामाच्या गावाला भेट दिलीय. इतका मोठा नेता आपल्या गावात येतोय म्हटल्यावर गावकऱ्यांनी पवार यांचे जल्लोषात स्वागत केलं.

इतकचं नाही तर, गावातल्या प्रत्येक घरावर आज गुढी उभारण्यात आली होती. प्रत्येक दारासमोर रांगोळी काढण्यात आली होती. गावातील महिलांनी पवारांचे औक्षणही केलं.

गावकऱ्यांच्या या स्वागताने शरद पवार ही चांगलेच भारावून गेले. मामाच्या गावची पोरगी करायचं राहून गेलं खरं अशी मिश्किल खंत शरद पवारांनी यावेळी व्यक्त केली. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number