Shakti Cyclone : ‘शक्ती’ चक्रीवादळाचा राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा; मच्छीमारांसाठीही विशेष सूचना

रबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ होणार असल्यामुळे त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रातील विविध ठिकाणी पाहायला मिळणार आहे.

Shakti Cyclone : ‘शक्ती’ चक्रीवादळाचा राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा; मच्छीमारांसाठीही विशेष सूचना

मुंबई: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसाने राज्यातील काही जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. पुढील काही दिवस राज्यात पाऊस होणार अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. 4 ते 8 ऑक्टोबर कालावधीत हवामानात मोठे बदल होणार असल्याचे सांगितले जात आहे. 

तसेच, 3 ते 5 ऑक्टोबरदरम्यान, महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर वादळी वारा होणार अशी शंका व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे, मच्छीमारांनी 5 ऑक्टोबरदरम्यान, समुद्रकिनारी जाणे टाळावे, असा इशाराही देण्यात आला आहे. अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ होणार असल्यामुळे त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रातील विविध ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे, नागरिकांनी कोणकोणती काळजी घ्यावी? यासह, 'शक्ती' चक्रीवादळामुळे महाराष्ट्र राज्याला धोका आहे की नाही? याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. 

शक्ती चक्रीवादळामुळे राज्यातील 'या' जिल्ह्यांना सतर्क राहण्याचा इशारा

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नगिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासह, राज्यातील काही ठिकाणी मुसळधार किंवा अतिमुसळधार पाऊस होणार असेही सांगितले जात आहे. यादरम्यान, मराठवाड्यातील काही गावात मोठ्या प्रमाणात पाऊस होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

हेही वाचा: Kisan Vikas Patra: शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची खास योजना; लहान रक्कम गुंतवा आणि मिळवा लाखोंचा नफा

मच्छीमारांसह नागरिकांसाठी विशेष सूचना

राज्याच्या किनारपट्टीवर शक्ती चक्रीवादळाचा परिणाम दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे, मच्छीमारांनी समुद्रकिनारी जाण्यास टाळावे. यासह, नागरिकांनी सतर्क राहण्यास सांगितले आहे. यासह, मागील काही दिवसांपासून शक्ती चक्रीवादळाबाबत अनेक अफवा पसरत होत्या. मात्र, हमावान खात्याने असे आवाहन केले आहे की, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number