शैलेश लोढा पुन्हा वादात

सब टीव्ही वाहिनीवरील ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ हा कार्यक्रम गेल्या दीड दशकांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेने प्रेक्षकांच्या मनात आपली छाप सोडली आहे. पण गेल्या काही वर्षांपासून या मालिकेतील काही प्रसिद्ध व्यक्तिरेखांनी मालिका सोडल्याने ही मालिका चर्चेत आलेली पहायला मिळाली. असच एक गाजलेलं पात्र म्हणजे तारक मेहता. जे साकारात होते अभिनेते […]

शैलेश लोढा पुन्हा वादात

सब टीव्ही वाहिनीवरील ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ हा कार्यक्रम गेल्या दीड दशकांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेने प्रेक्षकांच्या मनात आपली छाप सोडली आहे. पण गेल्या काही वर्षांपासून या मालिकेतील काही प्रसिद्ध व्यक्तिरेखांनी मालिका सोडल्याने ही मालिका चर्चेत आलेली पहायला मिळाली.

असच एक गाजलेलं पात्र म्हणजे तारक मेहता. जे साकारात होते अभिनेते शैलेश लोढा. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी या मालिकेचा निरो[प घेतला परंतु आता पुन्हा एकदा त्यांचं नाव लाइमलाइटमध्ये आलंय. अभिनेते शैलेश लोढा आणि तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांच्यामध्ये वाद सुरू आहेत अशा चर्चा सर्वत्र रंगत आहेत.त्यांना असित मोदी यांनी पैसे दिले नाहीत असे म्हंटले जात आहे. यावर काही दिवसांपूर्वी शैलेश लोढा यांनी भाष्य केले तर आता हे सर्व प्रकरण थेट कोर्टात जाऊन पोहचले आहे. अभिनेते . शैलेश लोढा यांनी असित मोदी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील महिन्यात यावर सुनावणी होणार आहे.

दुसरीकडे यावर असित मोदी म्हणाले की, ‘शैलेश लोढा आमच्या कुटुंब सदस्यांप्रमाणेच आहेत, त्यामुळे याला प्रकरणावर मी आणखी काही बोलू इच्छित नाही. शैलेश यांनी कार्यालयात येऊन त्यांचे पैसे घेऊन जावे. काही कागदांवर सह्या वगैरे करणे आवश्यक आहे, ते पूर्ण झाले की, शैलेश लोढाला पैसे मिळतील.’
आता यावर शैलेश लोढा काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number