शाहरुख- सलमान पुन्हा एकत्र

मुंबई,६ मे २०२३, प्रतिनिधी : शाहरुख सलमान यांची जोडी प्रेक्षकांना नेहमीच आवडते. अशातच त्या दोघांना एकत्र काम करताना पाहायला प्रेक्षक नेहमीच आतुर असतात. अलिडकेच पठाण या चित्रपटात ते दोघे एकत्र दिसून आले होते. तर आता शाहरुख आणि सलमान पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहेत. लवकरच अभिनेता शाहरुख खान आणि सलमान खान एकाच चित्रपटात झळकणार […]

शाहरुख- सलमान पुन्हा एकत्र

मुंबई,६ मे २०२३, प्रतिनिधी : शाहरुख सलमान यांची जोडी प्रेक्षकांना नेहमीच आवडते. अशातच त्या दोघांना एकत्र काम करताना पाहायला प्रेक्षक नेहमीच आतुर असतात. अलिडकेच पठाण या चित्रपटात ते दोघे एकत्र दिसून आले होते. तर आता शाहरुख आणि सलमान पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहेत.

लवकरच अभिनेता शाहरुख खान आणि सलमान खान एकाच चित्रपटात झळकणार आहेत. हा चित्रपट टायगर या चित्रपटाचा तिसरा भाग असल्याचे बोलले जात आह. तर ८ मे पासून या चित्रपटाची शूटिंग सुरु होणार आहे. या चित्रपटात शाहरुख आणि सलमान यांच्या व्यतिरिक्त अभिनेता इमरान हाश्मी आणि कतरिना कैफ देखील दिसणार आहेत. आदित्य चोप्रा निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन दिग्दर्शक मनीष शर्मा करत आहेत.
शाहरुख खान चा पठाण सुपरहिट झाला त्यानंतर आता टायगर 3 या चित्रपटाबाबतही असंच बोलले जात आहे. हा चित्रपट कमाईच्या बाबतीत शाहरुखच्या पठाणलाही मागे टाकेल, असं म्हटलं जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number