Shahrukh Khan : 14 वर्षांचा तो वनवास, आजतागायत शाहरुख खाननं ठेवलं नाही वानखेडेवर पाऊल…, ती घटना जिव्हारी लागली?

कोलकाता नाईट रायडर्सला चिअर करण्यासाठी संघ मालक शाहरुख खान बरेदचा मैदानावर उपस्थित राहतो.

Shahrukh Khan : 14 वर्षांचा तो वनवास, आजतागायत शाहरुख खाननं ठेवलं नाही वानखेडेवर पाऊल…, ती घटना जिव्हारी लागली?

आयपीएल 2026 चा हंगाम सुरू झाला आहे. 28 मार्चपासून सुरू झालेल्या सामन्यानंतर पहिल्या दिवशी बंगळुरू आणि हैदराबाद यांच्या लढत झाली असून काल, रविवारी मुंबई इंडियन्स आणि केकेआर यांच्यात सामना रंगला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला असून यात मुंबई इंडियन्सने दमदार विजय मिळवला. आयपीएलच्या सामन्यांमध्ये प्रामुख्याने हजेरी लावतात ते उद्योज, राजकारणी, सिने क्षेत्रातील कलाकार आणि संघ मालक. नेहमीप्रमाणे कालच्या मॅचलाही मुंबई इंडियन्सचे संघ मालक नीता अंबानी, मुकेश अंबानी, त्यांचा मोठा मुलगा, सून आणि नातू उपस्थित होते. तर कोलकाता नाईट रायडर्सला चिअर करण्यासाठी संघ मालक शाहरुख खानची मुलगी सुहाना वानखेडेमध्ये आली होती. मात्र या सेलिब्रिटींच्या गर्दीत शाहरुख खान कोणालाही दिसला नाही. खरतरं शाहरुख नेहमीच आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी येतो, हे यापूर्वीही पाहायला मिळाले आहे. काल तर केकेआरची आयपीएल 2026 च्या हंगामातील पहिली मॅच होती. तीदेखील शाहरुखचं घर असणाऱ्या मुंबईमध्ये. तरीही शाहरुखने सामन्याला दांडी मारली. असं का?, तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना. याच कारण भूतकाळाशी संबंधीत आहे. 

हेही वाचा : IPL 2026 RR vs CSK : आयपीएलच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडणार! CSK चे तिनही धुरंदर यंदा संघात नाही; आजच्या सामन्यात काय रणनिती?

16 मे 2012 रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर सामना रंगला होता. या सामन्यानंतर शाहरुख खानने तेथील सुरक्षा रक्षकाशी गैरवर्तणूक केल्याची घटना समोर आली. यावेळी सुरक्षा रक्षकांशी झालेल्या झटापटीमुळे, मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) केकेआरचे मालक शाहरुख खान यांच्यावर वानखेडे स्टेडियममध्ये प्रवेश करण्यावर पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. 

"एमसीए व्यवस्थापन समितीला शाहरुख खानला पाच वर्षांसाठी वानखेडे स्टेडियममध्ये प्रवेश करण्यावर बंदी घालण्यास भाग पडले आहे," असे एमसीएचे तत्कालिन अध्यक्ष विलासराव देशमुख यांनी मुंबईत सांगितले होते. "हा एकमताने घेतलेला निर्णय होता. हा निर्णय वानखेडेवरील कोणत्याही देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय सामन्याला लागू होतो. आम्ही आमच्या संघटनेची प्रतिष्ठा जपण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. बीसीसीआय ही आमची पालक संस्था आहे आणि जे घडले त्याची माहिती आम्ही त्यांना पत्र लिहून दिली आहे. बीसीसीआयच्या निर्णयावर आमचे कोणतेही नियंत्रण नाही. आम्ही एक स्वतंत्र संस्था आहोत आणि वानखेडे ही आमची मालमत्ता आहे," असे त्यांनी नमूद केले होते.

नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सला हरवल्यानंतर ही घटना घडली. सामना संपल्यानंतर शाहरुख मैदानावर जाण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आणि एमसीएच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तो दारूच्या नशेत होता आणि त्याने अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली होती, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा : IPL 2026 MI vs KKR : पहिल्याच सामन्यात चमकला MI चा लोकल बॉय; घरच्या मैदानावर ठरला मॅन ऑफ द मॅच

मात्र, शाहरुखने आपण दारू प्यायल्याचे नाकारले आणि सांगितले की, स्टेडियममधील अधिकाऱ्यांच्या "तिरस्करणीय" आणि "अक्षम्य" वागणुकीवर तो प्रतिक्रिया देत होता. त्याने सांगितले की, तो सामन्याला उपस्थित नव्हता, परंतु सामना संपल्यानंतर आपल्या मुलांच्या आणि त्यांच्या मित्रांच्या मोठ्या गटाला घेण्यासाठी तो तिथे गेला होता. शाहरुख म्हणाला की, त्याने सुरक्षा रक्षकांना मुलांना धक्काबुक्की करताना पाहिले आणि जेव्हा त्याने आक्षेप घेतला, तेव्हा अधिकाऱ्यांचा एक गट तिथे आला आणि वादाला सुरुवात झाली.

या घटनेला आता 14 वर्ष झाली आहे. शाहरुखवरील 5 वर्षांची बंदीदेखील पुढे तीन वर्षांची करण्यात आली. पंरतू, ही घटना शाहरुख खानच्या जिव्हारी लागली. त्यामुळे बंद उठवल्यानंतरही त्याने आजतागायत वानखेडे स्टेडियमवर पाय ठवले नाही. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number