जय महाराष्ट्र न्यूज, रायगड
अँग्री मॅन नेत्याला पाहून बॉलिवुडच्या बादशहाही हादरला आहे. अलिबाग जेट्टीवर हा ड्रामा रंगला.
या हाय व्होल्टेज ड्राम्यात प्रसंगात अँग्री यंग मॅन होते ते शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ आमदार जयंत पाटील. त्यांना हॉवरक्राफ्टने आपल्या घरी अलिबागला जायचं होते. पण जेट्टीवर खोळंबा झाल्यानं ते चांगलेच भडकले होते. शाहरुखच्या बोटीनं अडवला होता जयंत पाटलांचा रस्ता.
रागाच्या भरात त्यांनी खूप काही सुनावले. आपल्या परवानगीशिवाय कुणी अलिबागमध्ये येऊ देखील शकत नाही,असंही ते चिडून म्हणाले.
जयंत पाटलांना शाहरुखचा राग आला. जयंत पाटलांचा संताप पाहून शाहरुख बोटीतच थांबला. जयंत पाटलांची बोट गेल्यावर किंगखान बोटीतून बाहेर आला.