बॉलिवुड अभिनेता शाहिद कपूर आणि मिरा राजपूत कपूर यांना पुत्ररत्न प्राप्त झाला आहे.
मिराने या बाळाला हिंदुजा हॉस्पिटलमध्ये जन्म दिला. दोन वर्षानंतर पुन्हा एकदा शाहिद बाबा बनला असून त्याचा आनंदही दुप्पट झाला आहे.
संपूर्ण घरात खूप आनंदी वातावरण आहे. त्यांची पहिली मुलगी मिशा ही 2 वर्षांची झालीय.
मिशाला एक छोटा भाऊ झाल्याचे माहित पडल्यामुळे मिशा आपल्या भावाला सांभाळण्यासाठी त्याच्यासोबत खेळण्यासाठी फार उत्साही आहे.