नांदेडमध्ये शहा आणि पंकजा मुंडे एका व्यासपीठावर

नांदेड १० जून २०२३, प्रतिनिधी :  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून दोन दिवस गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि आंध्रच्या दौऱ्यावर आहेत. वेळापत्रकानुसार शाह शनिवारी सकाळी गुजरातमधील अहमदाबादला पोहोचतील. येथे ते अनेक बैैठकांना उपस्थित राहणार आहेत. दुपारी ते येथून महाराष्ट्राकडे रवाना होतील. गृहमंत्री नांदेडमध्ये जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. या सभेत त्यांच्यासोबत भाजप नेत्या पंकजा मुंडे या […]

नांदेडमध्ये शहा आणि पंकजा मुंडे एका व्यासपीठावर

नांदेड १० जून २०२३, प्रतिनिधी :  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून दोन दिवस गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि आंध्रच्या दौऱ्यावर आहेत. वेळापत्रकानुसार शाह शनिवारी सकाळी गुजरातमधील अहमदाबादला पोहोचतील. येथे ते अनेक बैैठकांना उपस्थित राहणार आहेत. दुपारी ते येथून महाराष्ट्राकडे रवाना होतील. गृहमंत्री नांदेडमध्ये जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. या सभेत त्यांच्यासोबत भाजप नेत्या पंकजा मुंडे या देखील उपस्थित राहणार आहेत. पंकजा मुंडे यांनी नुकतेच गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आपण आपले मागणे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मांडणार असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. राज्यातील पराभव पत्करावा लागलेल्या अनेकांना आमदारकी, खासदारकी आणि मंत्री पदे मिळाली. मात्र, माझ्यात काहीतरी कमतरता असेल म्हणून मला मिळाले नाही. अशी जाहीर नाराजी पंकजा मुंडे यांनी नुकतीच व्यक्त केली होती. तसेच याबाबत आपण केंद्रीय गृहमंत्री आणि माझे नेते अमित शहा यांच्याशी चर्चा करणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले होते. त्यामुळे आता अमित शहा यांच्यासोबत पहिल्यांदाच व्यासपीठावर येणाऱ्या पंकजा मुंडे काय बोलणार? याकडे लक्ष आहे लागले आहे.

पंकजा मुंडे यांच्या नाराजी नंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी देखील पंकजा मुंडे यांची भेट घेतली होती. त्यामुळे पंकजा मुंडे पक्षांतर करण्याची तयारी करत असल्याची चर्चा देखील रंगली आहे. मात्र, आता अमित शहा यांच्यासोबत त्या एका व्यासपीठावर येणार आहेत. नांदेडच्या सभेच्या निमित्ताने या भेटीचा योग आला आहे. त्यामुळे या भेटीत पंकजा मुंडे अमित शहा यांच्याकडे आपले गाऱ्हाणे मांडणार की, जाहीर व्यासपीठावर आपली नाराजी व्यक्त करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number