जयपूर गावात तीव्र पाणीटंचाई

जयपूर हे साधारण हजार बाराशे घरांची लोकवस्ती असणारं मोठं गाव आहे. सहा हजाराहून अधिक या गावची लोकसंख्या आहे. दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की या गावात पाणीटंचाईचं संकट उभे राहतं. सध्या गावात असणारी विहीर कोरडीठाक पडली आहे. हातपंपात पाणी नसल्यामुळे हातपंप बंद झाले आहेत. गावाच्या जवळपास कुठे पाण्याचे स्रोत नाही. त्यामुळे सध्या गावकऱ्यांना शेजारच्या गावातून येणाऱ्या […]

जयपूर गावात तीव्र पाणीटंचाई

जयपूर हे साधारण हजार बाराशे घरांची लोकवस्ती असणारं मोठं गाव आहे. सहा हजाराहून अधिक या गावची लोकसंख्या आहे. दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की या गावात पाणीटंचाईचं संकट उभे राहतं. सध्या गावात असणारी विहीर कोरडीठाक पडली आहे. हातपंपात पाणी नसल्यामुळे हातपंप बंद झाले आहेत. गावाच्या जवळपास कुठे पाण्याचे स्रोत नाही. त्यामुळे सध्या गावकऱ्यांना शेजारच्या गावातून येणाऱ्या टँकर मधून विकत पाणी घ्यावे लागते. याच पाण्याचा वापर गावकरी पिण्यासाठी आणि वापरण्यासाठी देखील करतात. परंतु अनेक गरीब कुटुंबांना विकतच पाणी परवडत नाही. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर मोफत टँकर तरी सुरू करावा अशी मागणी गावकरी करत आहेत.

जिल्ह्यात अपुऱ्या पावसामुळे दुष्काळी स्थिती आहे. वाढते तापमान, बाष्पीभवन, उपशामुळे प्रकल्प तसेच विहिरी, बोअर कोरडेठाक पडत आहेत. सर्व पाच तालुक्यांत पाणीटंचाईचे संकट गहिरे होत आहे. तालुकानिहाय टॅंकर सुरू असलेली गावे – हिंगोली, कनका, लोहगाव, कळमनुरी, माळधावंडा, खापरखेडा, शिवणी खु., वसमत, बाभूळगाव, औंढानागनाथ, रामेश्वर, सेनगाव, जयपूर, सेनगाव, कहाकर खु.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number