भारतीयांना घेऊन परतणारे सातवे विमान मुंबईत दाखल

रशिया-युक्रेन युद्धाचा तीढा असून तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. या युद्धामध्ये अनेक भारतीय रहिवासी युक्रेनमध्ये अडकलेले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. त्यामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने एअर इंडियासह ऑपरेशन गंगा हाती घेतली आहे. यानुसार भारतीयांना घेऊन परतणारे सातवे विमान मुंबईत दाखल झाले आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या १८२ विद्यार्थ्यांना घेऊन एअर […]

भारतीयांना घेऊन परतणारे सातवे विमान मुंबईत दाखल

रशिया-युक्रेन युद्धाचा तीढा असून तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. या युद्धामध्ये अनेक भारतीय रहिवासी युक्रेनमध्ये अडकलेले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. त्यामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने एअर इंडियासह ऑपरेशन गंगा हाती घेतली आहे. यानुसार भारतीयांना घेऊन परतणारे सातवे विमान मुंबईत दाखल झाले आहे.

युक्रेनमध्ये अडकलेल्या १८२ विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाच्या विशेष विमान मुंबईत दाखल झाले आहे. बुखारेस्ट, रोमानिया येथील भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित घेऊन एअर इंडियाचे विमान परतले आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने एअर इंडियासह ऑपरेशन गंगा हाती घेतली आहे. भारतीयांना युक्रेन घेऊन परतणारे हे सातवे विमान आहे.

‘ऑपरेशन गंगा’ला वेग

ऑपरेशन गंगा अंतर्गत भारतीय नागरिकांना बाहेर काढण्याचे काम वेगाने केले जाईल. यासाठी पंतप्रधान मोदींनी भारतीय हवाई दलालाही या ऑपरेशनमध्ये सहभागी होण्यास सांगितले आहे. हवाई दलाच्या विमानांची भर पडल्याने भारतीयांना परत येण्याच्या प्रक्रियेला वेग येईल आणि त्यांची संख्याही वाढेल. त्याचबरोबर भारतातून पाठवण्यात येणारी मदत सामग्रीही वेगाने पोहोचेल. ऑपरेशन गंगा अंतर्गत भारतीय हवाई दलाची अनेक सी-१७ विमाने आज उड्डाण करण्यास सुरुवात करू शकतात.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number