‘राज्यात सात दिवसांचा विलगीकरण कालावधी’ – राजेश टोपे

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाची वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंता वाढली असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. तसेच राज्यात येथून पुढे कोरोना रुग्णांचा विलगीकरणाचा कालावधी सात दिवसांचा असणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाची बैठक […]

‘राज्यात सात दिवसांचा विलगीकरण कालावधी’ – राजेश टोपे

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाची वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंता वाढली असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. तसेच राज्यात येथून पुढे कोरोना रुग्णांचा विलगीकरणाचा कालावधी सात दिवसांचा असणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये कोरोनाच्या महामारीला कशाप्रकारे रोखता येईल यावर चर्चा झाली असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. राज्यात नागरिकांच्या लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येणार आहे तर आरटीपीसीआर टेस्टसह अँटीजन टेस्टवरही भर देण्यात येणार आहे. तर खासगी रुग्णालयात बूस्टर डोसची सुविधा उपलब्ध करणार असल्याचेही ते म्हणाले. सध्याच्या परिस्थितीत टाळेबंदीची गरज नसून राज्यात कडक निर्बंध लागण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या तरी राज्यात १०० टक्के लॉकडाऊन लागण्याची शक्यता नाही. मात्र राज्यात कडक निर्बंध लावण्याच्या तयारीत असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे. त्यामुळे कोणत्या सेवा सुरू ठेवायच्या, कोणत्या नाही यावर बैठकित चर्चा झाली असल्याचे टोपे यांनी सांगितले. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे पुण्यात शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर राज्यात संध्याकाली ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी आहे. तरिही दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वेगाने वाढत आहे. त्यामुळे कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लागण्याच्या तयारीत राज्य सरकार आहे. तसेच मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून आज रात्रीपर्यंत कडक निर्बंधाची नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number