जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
आता एक आनंदाची बातमी आहे ती राज्य़ शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी. आता केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्यात येणाराय.
केंद्राच्या संरचनेनुसार आणि केंद्राने लागू केलेल्या दिनांकापासून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा लाभ देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या ३२ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते. सातव्या वेतन आयोगासंबंधी बक्षी समितीचे काम सुरू असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं…निवृत्तीवय ५८ वरून ६० आणि पाच दिवसाचा आठवडा याबाबत निर्णय अंतिम टप्प्यात असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.