Mumbai Local Trains Update : पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरू, तर कर्जत ते बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान लोकलसेवा ठप्प; तिन्ही मार्गावर गाड्या 15 – 20 मिनिटे उशीराने

मुंबई : मुंबईत आजही पावसाचा जोर कायम आहे. याचा परिणाम पश्चिम रेल्वे मार्गावरही होताना दिसून येत आहे. पश्चिम रेल्वेच्या (WR) मुंबई विभागाने रेल्वेबाबत माहिती दिली की, चर्चगेट-विरार मार्गावरील सर्व उपनगरीय लोकल गाड्या बुधवारी नियमितपणे धावत आहेत. सुरक्षित आणि सुरळीत रेल्वे वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी पश्चिम रेल्वेची पथके अहोरात्र काम करत असल्याचे रेल्वेने कळवले असून, प्रवाशांना प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी […]

Mumbai Local Trains Update : पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरू, तर कर्जत ते बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान लोकलसेवा ठप्प; तिन्ही मार्गावर गाड्या 15 – 20 मिनिटे उशीराने

मुंबई : मुंबईत आजही पावसाचा जोर कायम आहे. याचा परिणाम पश्चिम रेल्वे मार्गावरही होताना दिसून येत आहे. पश्चिम रेल्वेच्या (WR) मुंबई विभागाने रेल्वेबाबत माहिती दिली की, चर्चगेट-विरार मार्गावरील सर्व उपनगरीय लोकल गाड्या बुधवारी नियमितपणे धावत आहेत. सुरक्षित आणि सुरळीत रेल्वे वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी पश्चिम रेल्वेची पथके अहोरात्र काम करत असल्याचे रेल्वेने कळवले असून, प्रवाशांना प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या गाडीची अद्ययावत स्थिती तपासण्याचे आवाहन केले आहे. पश्चिम रेल्वेची पथके गाड्यांची सुरक्षित आणि सुरळीत वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी अहोरात्र काम करत आहेत. पश्चिम रेल्वेची लोकल ट्रेन सेवा सुरू असली, तरी प्रवाशांनी १०-१५ मिनिटांचा विलंब होत असल्याचे सांगितले.

हेही वाचा : Maharashtra Weather Update : पावसाचा जोर कमी! तरी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये बरसणार तुफान पाऊस; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यांतील पावसाची ताजी अपडेट

मुसळधार पावसामुळे वसई आणि विरार स्थानकांदरम्यान पाणी पातळी धोक्याच्या पातळीच्या वर गेल्याने मंगळवारी सायंकाळी पश्चिम रेल्वेची सेवा पुन्हा विस्कळीत झाली होती. पश्चिम रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले की, वसई आणि विरार दरम्यानच्या सर्व मार्गांवरील उपनगरीय रेल्वे सेवा ज्या सोमवारी आलेल्या व्यत्ययानंतर मंगळवारी पहाटे पूर्ववत करण्यात आल्या होत्या. त्या पुन्हा एकदा सायंकाळी साडेचारच्या सुमारास बंद कराव्या लागल्या. नव्याने झालेल्या पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे सेवा बंद केल्या होत्या.

मुंबईत दोन दिवस सतत कोसळलेल्या मुसळधार पावसानंतर बुधवारी पावसाचा जोर ओसरला असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, लोकल ट्रेन तसेच रस्ते वाहतूक हळूहळू पूर्ववत होऊ लागली. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, मुंबई आणि ठाणे येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पालघरसाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून तेथे काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान, बुधवारी सकाळीही पावसाचा जोर कायम असल्याने याचा फटका मुंबईकरांच्या लाईफलाइनलाही अर्थात रेल्वे सेवेला बसला आहे. मध्य रेल्वेच्या कर्जत ते बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान लोकलसेवा ठप्प झाली आहे. नेरळ स्थानकातील रेल्वे रुळावरती पाणी साचले असून रुळांवरून दगडीही वाहून गेल्याचे समोर आले आहे. कर्जत तालुक्यात कोसळणाऱ्या पावसामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. परिणामी, स्टेशन्सवर तसेच गाड्यांमध्येही मोठी गर्दी झाली असून प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

सततच्या पावसामुळे आज पहाटेच्या साडे पाचच्या सुमारास नेरळ आणि भिवपुरी रेल्वे स्थानकादरम्यान फाटकाजवळ, ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. रुळांवरही ते पाणी आल्याने, रुळाच्या खाली असलेली दगडीही पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेली. मात्र यामुळे कर्ज-खोपोली येथून बदलापूरच्या दिशेने येणारी जी लोकलसेवा होती. ती पूर्णपणे ठप्प झाली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number