मुंबईच्या सीएसएमटी, भायखळा, दादर रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या अफवेमुळे खळबळ उडाली . एका निनावी फोनच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस यंत्रणेची टीम बॉम्ब स्कॉड आणि डॉग स्कॉडसोबत स्टेशन परिसरात दाखल झाली आणि त्यांच्याकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. दोन तास हे सर्च ऑपरेशन सुरु होतं, सर्च ऑपरेशन दरम्यान पोलिसांना कोणतीही संशयित वस्तू याठिकाणी आढळून आली नाही.
शुक्रवारी रात्री ९ : ४५ दरम्यान रेल्वे विभागाला निनावी फोन आला होता.तत्काळ रेल्वे पोलीस, आरपीएफ यांच्याद्वारे सीएसएमटीच्या फलाट क्रमांक १ ते १८, विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय आणि परिसर, सेंट जॉर्ज गल्ली परिसर, धन्यवाद गेट परिसर, १८ क्रमांक पार्किंग, प्लॅटफॉर्म पार्किंग परिसराची सुरक्षा पथकाने, बॉम्बे शोधक आणि निकामी पथक, श्वान पथकाद्वारे तपासणी केली.