Pune Police Viral Video: शिरूर तालुक्यात खळबळ! टाकळी हाजी पोलीस चौकीत पोलीस अधिकाऱ्याचा हप्ते वसुलीचा व्हिडीओ व्हायरल

पोलीस चौकीमध्येच पैशांची देवाणघेवाण होत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून, यामुळे पोलीस दलाच्या प्रतिमेला मोठा तडा गेला आहे.

Pune Police Viral Video: शिरूर तालुक्यात खळबळ! टाकळी हाजी पोलीस चौकीत पोलीस अधिकाऱ्याचा हप्ते वसुलीचा व्हिडीओ व्हायरल

Pune Police Viral Video: पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी पोलीस चौकी सध्या गंभीर भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चर्चेत आली आहे. पोलीस चौकीमध्येच पैशांची देवाणघेवाण होत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून, यामुळे पोलीस दलाच्या प्रतिमेला मोठा तडा गेला आहे. तक्रार दाखल न करण्यासाठी किंवा प्रकरण मिटवण्यासाठी पोलिसांनी पैशांची मागणी केल्याचा आरोप तक्रारदारांकडून करण्यात आला असून, हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

स्टिंग ऑपरेशनमुळे पोलिसांचे पितळ उघडे
मिळालेल्या माहितीनुसार, एका विशिष्ट प्रकरणात कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी टाकळी हाजी येथील पोलिसांनी पैशांची दिवाणघेवाण केल्याचा संशय आहे. या संदर्भात करण्यात आलेल्या एका स्टिंग ऑपरेशनमध्ये पोलीस कर्मचारी पैसे स्वीकारताना दिसत असल्याचे बोलले जात आहे. या धक्कादायक प्रकारामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून, “रक्षकच भक्षक बनले का?” असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा – Beed Crime: बीड हादरलं! जन्मदात्या पित्यानेच चिमुकल्या मुलींवर डिझेल ओतून त्यांना पेटवण्याचा केला प्रयत्न, संतापजनक कारण समोर

वरिष्ठ पातळीवरून चौकशीची मागणी
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेण्याची मागणी जोर धरत आहे. ग्रामीण भागात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस चौकीतच जर असा उघड भ्रष्टाचार होत असेल, तर सर्वसामान्यांनी न्याय कोणाकडे मागायचा, असा संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणातील दोषी कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करून सखोल चौकशी करण्याची मागणी विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांनी केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number