ज्येष्ठ क्रीडा पत्रकार वि. वि. करमरकर यांचे निधन

मराठी क्रीडापत्रकारितेचे जनक ज्येष्ठ क्रीडा पत्रकार समलोचक व माजी क्रीडा संपादक वि. वि. करमरकर यांचं सोमवारी वृद्धापकाळानं निधन झालं. वि. वि. करमरकर यांचे सोमवारी सकाळी अंधेरी येथे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने राज्यातील क्रीडा क्षेत्राचा आणि खेळाडूंचा ज्येष्ठ मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. अंधेरी येथे पारशीवाडा स्मशानभूमी, अंधेरी पूर्व येथे […]

ज्येष्ठ क्रीडा पत्रकार वि. वि. करमरकर यांचे निधन

मराठी क्रीडापत्रकारितेचे जनक ज्येष्ठ क्रीडा पत्रकार समलोचक व माजी क्रीडा संपादक वि. वि. करमरकर यांचं सोमवारी वृद्धापकाळानं निधन झालं. वि. वि. करमरकर यांचे सोमवारी सकाळी अंधेरी येथे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने राज्यातील क्रीडा क्षेत्राचा आणि खेळाडूंचा ज्येष्ठ मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. अंधेरी येथे पारशीवाडा स्मशानभूमी, अंधेरी पूर्व येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

१९६० च्या आधी मराठी दैनिकांमध्ये खेळांच्या बातम्यांना प्रमुख स्थान नव्हते. ते करमरकर यांनी मिळवून दिले. यासाठी एक पूर्ण पान तयार करून खेळांची आवड असणाऱ्या वाचकांची भूक त्यामधून त्यांनी पूर्ण केली. १९६२ मध्ये महाराष्ट्र टाइम्स सुरू झाल्यानंतर या दैनिकाच्या पहिल्या टीममध्ये करमरकर यांचा सहभाग होता. द्वा.भ.कर्णिक संपादक असलेल्या या दैनिकात सुरुवातीला आधी दोन कॉलममध्ये क्रीडा जगताच्या बातम्या येत असत.

मूळचे नाशिकचे असलेल्या करमकरांचे वडील डॉक्टर होते. आपल्या मुलानं सुद्धा डॉक्टर व्हावं अशी त्यांची इच्छा होती. मात्र, करमकरांनी एमए करत पत्रकरितेची वेगळी वाट निवडली. त्यातही क्रीडा पत्रकारितेत ते रमले. इंग्रजी वर्तमानपत्राप्रमाणे मराठी वर्तमानपत्रातही खेळांच्या जास्तीत जास्त बातम्या असाव्यात असा त्यांचा आग्रह होता. त्याच आग्रहातून मराठी वर्तमानपत्रात खेळ या विषयाला वाहिलेलं स्वतंत्र पान सुरू झालं. या पानावर त्यांनी देशी-विदेशी खेळांच्या बातम्यांना प्राधान्य दिलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number