शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचे निधन

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचे गुरुवारी निधन झाले आहे. वयाच्या ८१व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून सुधीर जोशी यांची प्रकृती खालावली होती. तसेच त्यांना कोरोनाची लागणसुद्धा झाली होती. मुंबईतील जसलोक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. नुकताच ते घरी परतले होते. मात्र त्यानंतर पुन्हा त्यांची प्रकृती अस्थिर झाली. सुधीर जोशी हे शिवसेना […]

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचे निधन

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचे गुरुवारी निधन झाले आहे. वयाच्या ८१व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून सुधीर जोशी यांची प्रकृती खालावली होती. तसेच त्यांना कोरोनाची लागणसुद्धा झाली होती. मुंबईतील जसलोक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. नुकताच ते घरी परतले होते. मात्र त्यानंतर पुन्हा त्यांची प्रकृती अस्थिर झाली.

सुधीर जोशी हे शिवसेना प्रमुख शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जवळचे विश्वासू होते. तसेच शिवसेना पक्ष संघटनेत सुधीर जोशी यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून त्यांची ओळख असून सुधीर जोशी मुंबईचे दुसरे महापौर होते.

पहिल्या युतीच्या सरकारमध्ये सुधीर जोशी यांनी महाराष्ट्राचे कॅबिनेटपदही भूषावले आहे. युती सरकारच्या काळात त्यांनी महसूलमंत्री आणि शिक्षण मंत्री म्हणून देखील काम हाताळले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number