ज्येष्ठ दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचं दु:खद निधन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई ज्येष्ठ दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचं निधन झालं असून पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. पुण्याच्या दीनानाथ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होता दीर्घ आजारानं ते निधन पावले. कोल्हटकरांनी प्रायोगिक नाटकांमधून नेपथ्थकार म्हणून सुरुवात केली होती, त्यानंतर ते हळूहळू दिग्दर्शनाकडे वळाले. कोल्हाटकरांनी आपल्या कारकीर्दीत नाटकांमध्ये कायमच स्व:ताची एक वेगळीचं छाप सोडली. दिलीप कोल्हटकर […]

ज्येष्ठ दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचं दु:खद निधन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

ज्येष्ठ दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचं निधन झालं असून पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. पुण्याच्या दीनानाथ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होता दीर्घ आजारानं ते निधन पावले.

कोल्हटकरांनी प्रायोगिक नाटकांमधून नेपथ्थकार म्हणून सुरुवात केली होती, त्यानंतर ते हळूहळू दिग्दर्शनाकडे वळाले. कोल्हाटकरांनी आपल्या कारकीर्दीत नाटकांमध्ये कायमच स्व:ताची एक वेगळीचं छाप सोडली.

दिलीप कोल्हटकर यांनी दिग्दर्शित केलेलं ‘मोरुची मावशी’ हे नाटक सर्वाधिक गाजलं असून राजाचा खेळ, उघडले स्वर्गाचे दार, कवडी चुंबक अशा अनेक नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनी केलं होतं. व्यावसायिक नाटकांमध्ये कोल्हाटकर यांनी नेपथ्थ, प्रकाशयोजना आणि दिग्दर्शक अशा भूमिका पार पाडल्या.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number