‘त्या’ प्रश्नावरून शिवसेना आणि विरोधक एकवटले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्या कर्जमाफी आणि अवकाळीमुळे झालेलं नुकसान याबाबत विरोधकांचे शिष्टमंडळ राज्यपाल विद्यासागर राव यांची भेटीला आलं.     शेतकरी आत्महत्या रोखण्याकरता शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्याची आवश्यकता असून, त्याकरता विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करत विरोध राजभवनात दाखल झाले आहेत.     राज्यपालासोबत त्यांची बैठक होणार आहे. या शिष्टमंडळामध्ये […]

‘त्या’ प्रश्नावरून शिवसेना आणि विरोधक एकवटले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्या कर्जमाफी आणि अवकाळीमुळे झालेलं नुकसान याबाबत विरोधकांचे शिष्टमंडळ राज्यपाल विद्यासागर राव यांची भेटीला आलं.

 

 

शेतकरी आत्महत्या रोखण्याकरता शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्याची आवश्यकता असून, त्याकरता विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करत विरोध राजभवनात दाखल झाले आहेत.

 

 

राज्यपालासोबत त्यांची बैठक होणार आहे. या शिष्टमंडळामध्ये विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित आहेत.

 

दरम्यान, दुसरीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत शिवसेना मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. वर्षा निवासस्थानी त्यांची बैठक पार पडली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी विशेष अधिवेशन बोलवाव आणि GSTसाठीचं 3 दिवसांचं अधिवेशन 5 दिवसांचं करावं, अशी मागणी शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांकडे केली. 

 

 

याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक आहेत. याबाबत भाजपच्या इतर गटनेत्यांशी चर्चा करून 2 दिवसांत निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शिवसेना मंत्र्यांना दिलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number