जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर
कोल्हापूरच्या पंचगंगा नदीत शहरातल्या जयंती नाल्याचे पाणी मिसळत असताना कोल्हापूर महापालिका यावर कोणतीच उपाययोजना करत नसल्याने शिवसेनेनं कोल्हापूरमध्ये आंदोलन केलयं. या आंदोलनात शिवसैनिकांनी नाल्यातील दूषित पाणी घागरी मधून महापालिकेत आणले. तसंच यापूर्वीही या दूषित पाण्यामुळे काविळीची साथ येऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता, पण महापालिका याबाबत उपाययोजना करत नसल्याचा आरोप करीत शिवसेनेनं आज हे आंदोलन केलं.
जयंती नाल्यातील ड्रेनेज लाइन दुरुस्तीस होणाऱ्या विलंबाच्या निषेधार्थ शिवसेनेने महानगरपालिकेवर मोर्चा काढून धडक मारलीये. जयंती नाल्यात मिसळणारा मैला थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्याने नागरिकांच्या जिविताशी खेळ करणाऱ्या महानगरपालिका आयुक्तांवर फौजदारी गुन्हे दाखल करा…अशी मागणी करत यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजीही केलीये. हे प्रदूषित पाणी जर रोखलं नाही तर त्याच पाण्याने आयुक्तांना अंघोळ घालण्याचा इशारा शिवसेनेने दिलाय.