सेनेचा वाद चव्हाट्यावर, महिला शिवसैनिकांची विभागप्रमुखांना धक्काबुक्की

जय महाराष्ट्र न्यूज, मुबंई गोवंडीमध्ये शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. महिला शिवसैनिकांनी शिवाजी नगरमधील शिवसेना विभागप्रमुखांना धक्काबुक्की केल्याची घटना समोर आलीय. शिवाजी नगर शिवसेना विभाग प्रमुख राजेंद्र राऊत यांना महिला शिवसैनिकांनी धक्काबुक्की केल्याचा व्हिडीओ समोर आलाय. शिवाजी नगरमधील पदवाटप कार्यक्रमात राजेंद्र चव्हाणांना धक्काबुक्की करण्यात आलीय. कार्यक्रम सुरु असताना महिला शिवसैनिक आक्रमक झाल्या. यावेळी राजेंद्र चव्हाण […]

सेनेचा वाद चव्हाट्यावर, महिला शिवसैनिकांची विभागप्रमुखांना धक्काबुक्की

जय महाराष्ट्र न्यूज, मुबंई

गोवंडीमध्ये शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. महिला शिवसैनिकांनी शिवाजी नगरमधील शिवसेना विभागप्रमुखांना धक्काबुक्की केल्याची घटना समोर आलीय. शिवाजी नगर शिवसेना विभाग प्रमुख राजेंद्र राऊत यांना महिला शिवसैनिकांनी धक्काबुक्की केल्याचा व्हिडीओ समोर आलाय. शिवाजी नगरमधील पदवाटप कार्यक्रमात राजेंद्र चव्हाणांना धक्काबुक्की करण्यात आलीय.

कार्यक्रम सुरु असताना महिला शिवसैनिक आक्रमक झाल्या. यावेळी राजेंद्र चव्हाण यांच्याशी असलेली त्यांची शाब्दिक बाचाबाची धक्काबुक्कीत रुपांतर झाली. यावेळी महिला शिवसैनिक आणि घाटकोपर विभाग प्रमुख राजेंद्र चव्हाण यांच्यातील वाद वाढल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, धक्काबुक्की आणि मारहाण झालीच नसल्याचे विभागप्रमुख राजेंद्र राऊत यांनी ‘जय महाराष्ट्र’शी बोलताना सांगितलय. या घटनेने कार्यक्रमा दरम्यान काही काळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number