शेतकरी संपावरुन शिवसेना-भाजपात आमनेसामने

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   शेतकरी कर्जमाफीवरुन आक्रमक शिवसेनेने मुंबईत पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतून काढता पाय घेतला. तसंच जोवर शेतकरी कर्जमुक्तीबाबत स्पष्ट भूमिका घेत नाही तोवर मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचंदेखील शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलं. मंत्रिमंडळ बैठकीतून बाहेर पडल्यानंतर शिवसेना मंत्र्यांनी तात्काळ मंत्रालयातील दालनात बैठक घेऊन नवी रणनिती आखली.   दरम्यान, शेतकऱ्यांना अंधारात ठेऊन […]

शेतकरी संपावरुन शिवसेना-भाजपात आमनेसामने

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शेतकरी कर्जमाफीवरुन आक्रमक शिवसेनेने मुंबईत पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतून काढता पाय घेतला. तसंच जोवर शेतकरी कर्जमुक्तीबाबत स्पष्ट भूमिका घेत नाही तोवर मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचंदेखील शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलं. मंत्रिमंडळ बैठकीतून बाहेर पडल्यानंतर शिवसेना मंत्र्यांनी तात्काळ मंत्रालयातील दालनात बैठक घेऊन नवी रणनिती आखली.

 

दरम्यान, शेतकऱ्यांना अंधारात ठेऊन निर्णय घेऊ देणार नाही. संपूर्ण कर्जमाफीच पाहिजे अशी शिवसेनेची ठोस भूमिका असल्याचं शिवसेनेचे नेते सुभाषदेसाई यांनी सांगितलं.

 

राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर भाजपने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. शेतकरी कर्जमाफी व्हावी ही भाजपची भूमिका असल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केली. तसेच शिवसेना मंत्र्यांनी बैठकीवर बहिष्कार घातला नाही, बैठकीला अनुपस्थितीत राहण्याची परवानगी मागितली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number