राष्ट्रपतीपदावरून शिवसेना-भाजपात पुन्हा सामना?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   राष्ट्रपतीपदावरून शिवसेना – भाजपात पुन्हा सामना रंगण्याची शक्यता आहे. शिवसेना आज आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. संध्याकाळी 6 वाजता मातोश्रीवर बैठक होणार आहे. भाजपनं राष्ट्रपतीपदासाठी रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा केली.     शिवसेनेनं सुचवलेल्या नावांवरून भाजपनं सेनेशी चर्चाही केलेली नाही. दलित चेहरा दिल्यानं सेनेनं नाराजी व्यक्त केली. फक्त दलितांच्या […]

राष्ट्रपतीपदावरून शिवसेना-भाजपात पुन्हा सामना?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राष्ट्रपतीपदावरून शिवसेना – भाजपात पुन्हा सामना रंगण्याची शक्यता आहे. शिवसेना आज आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. संध्याकाळी 6 वाजता मातोश्रीवर बैठक होणार आहे. भाजपनं राष्ट्रपतीपदासाठी रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा केली.

 

 

शिवसेनेनं सुचवलेल्या नावांवरून भाजपनं सेनेशी चर्चाही केलेली नाही. दलित चेहरा दिल्यानं सेनेनं नाराजी व्यक्त केली. फक्त दलितांच्या मतावर डोळा ठेवून भाजपनं कोविंद यांच्या नावाची घोषणा केली असून, मतांसाठी हे राजकारण चुकीचं असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलं. शिवसेनेच्या वर्धापनदिन सोहळ्यात त्यांनी आपली भूमिका मांडली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number