हापूसच्या नावाखाली कर्नाटकी आंब्यांची विक्री

हापूसच्या नावाखाली कर्नाटकातील आंब्याची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आता स्थानिक आंबा बागायतदार चांगलेच आक्रमक झाले आहेत. या वर्षीच्या हंगामात निसर्गाच्या त्रुटीमुळे हापूस आंब्याचं उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी आले आहे. अनेक बागायतदारांनी हापूसच्या नावाखाली कर्नाटकातील आंबा विक्री करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना आणि बागायतदारांना भेटून समज देण्यात येणार असल्याचे आंबा उत्पादक संघाचे […]

हापूसच्या नावाखाली कर्नाटकी आंब्यांची विक्री

हापूसच्या नावाखाली कर्नाटकातील आंब्याची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आता स्थानिक आंबा बागायतदार चांगलेच आक्रमक झाले आहेत.

या वर्षीच्या हंगामात निसर्गाच्या त्रुटीमुळे हापूस आंब्याचं उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी आले आहे. अनेक बागायतदारांनी हापूसच्या नावाखाली कर्नाटकातील आंबा विक्री करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना आणि बागायतदारांना भेटून समज देण्यात येणार असल्याचे आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष बावा साळवी यांनी म्हटलं आहे.

हापूसचं महत्त्व कमी करून बेचव आंबा बाजारात आणला जात आहे. हा प्रकार वेळीच थांबला नाही तर अशा बागायतदारांविरोधात कठोर भूमिका घेतली जाणार असल्याचं हापूस आंबा उत्पादक संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. शिवाय हापूसच्या नावावर इतर आंब्यांची विक्री करणाऱ्यांवर कृषी विभागाने कठोर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number