महापालिके समोर महिलांसाठी सेल्फी पॉईंट

दरवर्षी दिनांक ८ मार्च रोजी जगभरात महिला दिन साजरा केला जातो. याच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने महानगरपालिका मुख्यालया समोरील ‘सेल्फी पॉईंट’वर अनोख्या पद्धतीने कृतज्ञता व्यक्त केली आहे‌. यामध्ये गुलाब, शेवंती, डेझी आणि जिप्सोफीला या फुलांचा वापर करून हृदयाची आकर्षक प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. महिलांप्रती हृदयापासून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तयार […]

महापालिके समोर महिलांसाठी सेल्फी पॉईंट

दरवर्षी दिनांक ८ मार्च रोजी जगभरात महिला दिन साजरा केला जातो. याच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने महानगरपालिका मुख्यालया समोरील ‘सेल्फी पॉईंट’वर अनोख्या पद्धतीने कृतज्ञता व्यक्त केली आहे‌. यामध्ये गुलाब, शेवंती, डेझी आणि जिप्सोफीला या फुलांचा वापर करून हृदयाची आकर्षक प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. महिलांप्रती हृदयापासून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तयार केलेली ही प्रतिकृती महिला दिनाच्या निमित्ताने दिवसभर आणि संध्याकाळी उशिरापर्यंत ‘सेल्फी पॉईंट’वर असणार आहे, अशी माहिती उद्यान अधीक्षक श्री जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना श्री परदेशी यांनी सांगितले आहे की, ही प्रतिकृती तयार करण्यासाठी वापरण्यात आलेली बहुतांश फुले ही महापालिका उद्यानांमधील आहेत. तसेच तयार करण्यात आलेली प्रतिकृती ही तब्बल ८ फूट उंचीची आणि ५ फूट लांबीची आहे. ही प्रतिकृती तयार करण्यासाठी सुमारे ५०० पेक्षा अधिक गुलाब आणि तेवढ्याच संख्येतील शेवंतीच्या फुलांचा वापर करण्यात आला आहे. तर डेझी आणि जिप्सोफिला या फुलांचे प्रत्येकी १० गुच्छ यासाठी वापरण्यात आले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number