अनेक वर्षापासुन फक्त कागदावर असलेला प्रवास प्रत्यक्षात होडीत उतरला; कल्याण ते वसई फक्त एका तासात

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   कल्याण ते वसई हे अंतर साधारण 3 साडेतीन तासाचं. पण, जर आम्ही तुम्हाला सांगितलं की कल्याण हुन वसईला  तुम्ही 1तासात पोहचू शकता तर कदाचीत तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र, ही वस्तुस्थिती आहे. कारण आता कल्याणच्या खाडी पासुन थेट वसईच्या खाडीतुन जलवाहतुक सुरु होणार आहे. गेल्या अनेक वर्षापासुन फक्त कागदावर असलेला […]

अनेक वर्षापासुन फक्त कागदावर असलेला प्रवास प्रत्यक्षात होडीत उतरला; कल्याण ते वसई फक्त एका तासात

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

कल्याण ते वसई हे अंतर साधारण 3 साडेतीन तासाचं. पण, जर आम्ही तुम्हाला सांगितलं की कल्याण हुन वसईला  तुम्ही 1तासात पोहचू शकता तर कदाचीत तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र, ही वस्तुस्थिती आहे. कारण आता कल्याणच्या खाडी पासुन थेट वसईच्या खाडीतुन जलवाहतुक सुरु होणार आहे. गेल्या अनेक वर्षापासुन फक्त कागदावर असलेला हा प्रवास आता प्रत्यक्षात होडीत उतरलाय. 

वाहतुक कोंडीवर उतारा म्हणुन जलवाहतुकीचा एक सक्षम पर्याय समोर येतोय. सुदैवाने ठाणे जिल्ह्याला विस्तीर्ण खाडी किनारा लाभलाय. मात्र गेल्या अनेक वर्षापासुन या खाडीतुन वाऴू उपश्या शिवाय काही झालं नाही.

मात्र, केंद्रात आणि राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जलवाहतुकीचं स्वप्न पाहिलं आणि शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि राजन विचारे यांनी ते पुर्णत्वास नेण्याचे प्रयत्न सुरु केले.. श्रीकांत शिंदे यांनी गेले वर्षभर मेरीटाईम बोर्डाकडे जलवाहतुकी संदर्भात पाठपुरावा केला. आणि नुकतीच त्यांनी या अधिका-यांसोबत जलवाहतुकीची ट्रायल देखील घेतली.

जलवाहतुकीचा हा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. समुद्रमार्गे वाहतुक सरकारला सुरु करायची जरी असली तरीही राज्यातल्या खाड्यांमधला हा पहिलाच प्रकार आहे. हा मार्ग तयार करताना आधुनिक तंत्रज्ञानाता वापर करण्यात येणाराय. जलमार्गात येणारे दगड देखील अत्याधुनिक पद्धतीने बाजूला करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे मनपाचे अधिकारी कॅप्टन  रोहिला यांनी दिली.

केंद्र सरकारकडून प्रकल्पासाठी 500 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलीय. या कामासाठी आवश्यक असलेल्या काही परवानग्या मेरीटाइम बोर्ड आणि पर्यावरण  विभागाकडून अद्याप मिळालेल्या नाहीत. मात्र या कामाला लवकरच सुरुवात होईल, असे  या पाहणीदौऱ्यामुळे तरी वाटतेय. पहिल्या टप्प्यात प्रवासी सेवा सुरू झाल्यानंतर भविष्यात या ठिकाणी रोरो सेवा देखील सुरु होण्याची चिन्हे आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number