Section 144 In Mumbai : पुण्यानंतर मुंबईतही आदेश लागू ! 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे पोलिसांचे आदेश; 5 पेक्षा जास्त लोकं एकत्र दिसल्यास होणार कारवाई

मुंबई : दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान मुंबईतून मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईमध्ये पुढील 15 दिवसांपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले असून संबंधीत आदेशाचे पत्रक मुंबई पोलीस आयुक्तांनी जारी केले आहेत. त्यामुळे आता मुंबईत 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदी लागू असणार आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 23 जुलै 2026 रोजी रात्री 12.01 वाजल्यापासून 6 ऑगस्ट 2026 […]

Section 144 In Mumbai : पुण्यानंतर मुंबईतही आदेश लागू ! 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे पोलिसांचे आदेश; 5 पेक्षा जास्त लोकं एकत्र दिसल्यास होणार कारवाई

मुंबई : दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान मुंबईतून मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईमध्ये पुढील 15 दिवसांपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले असून संबंधीत आदेशाचे पत्रक मुंबई पोलीस आयुक्तांनी जारी केले आहेत. त्यामुळे आता मुंबईत 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदी लागू असणार आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 23 जुलै 2026 रोजी रात्री 12.01 वाजल्यापासून 6 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू होतील. यामध्ये सार्वजनिक शांतता भंग होण्याची, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची तसेच मानवी जीवित व मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन हे आदेश जारी करण्यात आले आहेत. 

हेही वाचा : Delhi Jantar Mantar Protest: संसदेच्या अधिवेशनादरम्यान दिल्लीत गदारोळ; आंदोलकांवर लाठीचार्ज, इंटरनेट आणि मोबाईल यंत्रणा ठप्प

या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारच्या मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली असून मिरवणुकांमध्ये लाऊडस्पीकर, ध्वनिवर्धक, वाद्यवृंद तसेच फटाके फोडण्यासही मनाई करण्यात आली आहे. विवाह समारंभ, अंत्ययात्रा, कंपन्या व सहकारी संस्थांच्या वैधानिक बैठका, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, शैक्षणिक संस्था, सरकारी कार्यालये, न्यायालये, दुकाने, कारखाने आणि नियमित व्यावसायिक कामकाज यांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. झोनल पोलीस उपायुक्त किंवा संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने काही सभा किंवा मिरवणुकांना परवानगी दिली जाऊ शकते, असेही यात नमूद करण्यात आले आहे. तसेच आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number