MPSC News : FDA च्या पेपरफुटी प्रकरणी MPSC चे स्पष्टीकरण; उच्चस्तरीय बैठकीनंतर आयोगाचा मोठा निर्णय

मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागातील ‘औषध निरीक्षक (गट-ब)’ भरती परीक्षेतील पेपरफुटीबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत एका पत्रकार परिषदेतून ही माहिती दिली आहे. त्यांनी पहिल्यांदाच स्पष्टीकरण देत प्राप्त पुरावे आणि निवेदनांची सखोल पडताळणी करून संबंधितांविरोधात पोलिसांत रीतसर तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांनी […]

MPSC News : FDA च्या पेपरफुटी प्रकरणी MPSC चे स्पष्टीकरण; उच्चस्तरीय बैठकीनंतर आयोगाचा मोठा निर्णय

मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागातील ‘औषध निरीक्षक (गट-ब)’ भरती परीक्षेतील पेपरफुटीबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत एका पत्रकार परिषदेतून ही माहिती दिली आहे. त्यांनी पहिल्यांदाच स्पष्टीकरण देत प्राप्त पुरावे आणि निवेदनांची सखोल पडताळणी करून संबंधितांविरोधात पोलिसांत रीतसर तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांनी ही माहिती दिली.

हेही वाचा : PM Kisan Yojana 24th Installment: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ऑक्टोबरमध्ये खात्यात येणार 2000 रुपये?

काय आहे प्रकरण –

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक भरती परीक्षेचा पेपर दोन दिवसांआधीच फुटल्याचा खळबळजनक आरोप काही उमेदवारांनी केला आहे. 100 पैकी 90 प्रश्न आधीच व्हॉट्सॲपवर व्हायरल झाल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन काही प्रश्न उपस्थित केले आहेत. या सगळ्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पहिल्यांदाच पेपरफुटीच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक भरती प्रकरणी आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला होता. सीबीडी बेलापूर येथील एमपीएससी कार्यालयात या संदर्भात उच्चस्तरीय बैठक झाली. याप्रकरणी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर भाष्य करण्यास महाराष्ट्र लोक आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांनी नकार देताना उद्यापर्यंत माहिती देऊ, असे म्हणत माध्यमांशी बोलणं टाळले. परंतु बैठक आटोपल्यानंतर त्यांनी पेपरफुटीची गंभीर दखल घेतल्याचे स्पष्टीकरण दिले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number