हा आहे मिस्टर परफेक्शनिस्टचा ‘सिक्रेट सुपरस्टार’

जय महाराष्ट्र न्यूज, मुबई   बॉलिवूडचे मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या ‘सिक्रेट सुपरस्टार‘या सिनेमाचा ट्रेलर लॉंच झाला आहे. आमिरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सिक्रेट सुपरस्टार सिनेमाचा ट्रेलर लॉंच केला आहे. 2016 मध्ये आलेला आमिरचा दंगल सिनेमात झायरा वासिमने आनिरच्या मुलीची भूमिका साकारली होती. तर सिक्रेट सुपरस्टार सिनेमात सायरा आमिरसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.   आमिर आपल्या सिनेमांमार्फत […]

हा आहे मिस्टर परफेक्शनिस्टचा ‘सिक्रेट सुपरस्टार’

जय महाराष्ट्र न्यूज, मुबई

 

बॉलिवूडचे मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या ‘सिक्रेट सुपरस्टार‘या सिनेमाचा ट्रेलर लॉंच झाला आहे. आमिरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सिक्रेट सुपरस्टार

सिनेमाचा ट्रेलर लॉंच केला आहे.

2016 मध्ये आलेला आमिरचा दंगल सिनेमात झायरा वासिमने आनिरच्या मुलीची भूमिका साकारली होती. तर सिक्रेट सुपरस्टार सिनेमात सायरा आमिरसोबत मुख्य

भूमिकेत दिसणार आहे.

 

आमिर आपल्या सिनेमांमार्फत नेहमीच एक वेगळा विषय प्रेक्षकांसमोर मांडतो. दंगलमध्ये आमिरने मुलींनाही मुलांइतकेच महत्त्व देण्याचा संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला.

 

सिक्रेट सुपरस्टार हा सिनेमा 14 वर्षीय इन्सियाच्या आयुष्यावर आधारित आहे. इन्सियाला गायनाची अत्यंत आवड आहे. तिला आईचा पाठींबा आहे. मात्र वडील तिच्या

गायनाला तीव्र विरोध करतात. पण सोशल मिडीयाच्या मदतीने इन्सिया गायनाला प्रसिध्दि मिळवते असे या ट्रेलरमध्ये कळतयं. 19 ऑक्टोबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या

भेटीस येणार आहे. दरम्यान सिनेमाबद्दलची उतसुकता प्रक्षकांमध्ये पाहायला मिळाली आहे.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number