पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गुजरात दौऱ्याचा दुसरा दिवस

देशातील पाच राज्यांपैकी चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजप विजयी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी १० किमी लांबीचा रोड शो केला तर त्यांनी दोन वर्षानंतर आईची भेट घेतली. दरम्यान, पंतप्रधान मोदींचा गुजरात दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. आज ते दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार असून क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन […]

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गुजरात दौऱ्याचा दुसरा दिवस

देशातील पाच राज्यांपैकी चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजप विजयी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी १० किमी लांबीचा रोड शो केला तर त्यांनी दोन वर्षानंतर आईची भेट घेतली. दरम्यान, पंतप्रधान मोदींचा गुजरात दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. आज ते दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार असून क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत.

गुजरात दौऱ्याचा दुसरा दिवस

आज पंतप्रधान मोदी सकाळी दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ते अहमदाबादच्या नवरंगपुरा भागातील सरदार पटेल क्रिडांगणात सायंकाळी ६ ते ८ या वेळेत खेळ महाकुंभाच्या उद्घाटन सोहळ्याच उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर, रात्री ८.३०वा. ते विशेष विमानाने दिल्लीला रवाना होणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात दौऱ्याच्या पहिल्या दिवशी गुजरामध्ये रोड शो केला. विमानतळापासून सुरू झालेला रोड शो १० किमी अंतरावर असलेल्या गांधीनगर येथील भाजपचे राज्य मुख्यालय कमलम येथे संपला. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा चाहत्यांकडून अभिवादन करण्यात आले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number