राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हा आगामी लोकसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून करण्यात येणार आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळाचा होणारा विस्तार हा छोटेखानी असेल अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. सध्याच्या मंत्रीमंडळ विस्तारत भाजपच्या सहा आणि शिवसेनेच्या चार जणांना स्थान मिळण्याची शक्यता आहे. भाजपचे चार कॅबिनेट मंत्री तर दोन हे राज्यमंत्री आणि शिवसेनेचे दोन कॅबिनेट मंत्री तर दोन आमदर राज्यमंत्री होण्याची शक्यता आहे. तसेच जी उरलेली १३ रिक्त मंत्रिपदे ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान भरली जाऊ शकतात अशी देखील माहिती मिळतेय. विशेष बाब म्हणजे हा छोटेखानी विस्तार केल्यानंतर काही इच्छुकांची महामंडळावर बोळवण होऊ शकते.