Raosaheb Charitable Trust : रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्टचे कार्य देशहिताचे; डॉ. उदय कुलकर्णी यांचे गौरवोद्‌गार

डिजिटल विश्वातील ‘रावसाहेब कट्टा’ या व्यासपीठावरून एकत्र येत सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या 'रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्ट'चा द्वितीय वर्धापन दिन सोहळा साजरा झाला.

Raosaheb Charitable Trust : रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्टचे कार्य देशहिताचे; डॉ. उदय कुलकर्णी यांचे गौरवोद्‌गार

प्रसाद काथे 

पुणे : समाजमाध्यमातून एकत्र येऊन निर्मित झालेल्या राबसाहेब चॅरिटेबल ट्रस्टचे देव, देश आणि धर्माला केंद्रस्थानी मानून सुरू असलेले कार्य महनीय असून देशाचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलू शकेल, असे गौरवोद्‌गार इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक, नौदलात सेवा बजाविलेले ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. उदय कुलकर्णी यांनी काढले. डिजिटल विश्वातील ‘रावसाहेब कट्टा’ या व्यासपीठावरून एकत्र येत सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या 'रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्ट'चा द्वितीय वर्धापन दिन सोहळा शनिवारी साजरा झाला. त्यावेळी डॉ. कुलकर्णी यांनी ट्रस्टच्या कार्याचे कौतुक केले. न्यू इंग्लिश स्कूलमधील गणेश हॉल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ट्रस्टचे अध्यक्ष मकरंद जोशी, संस्थापक सदस्य रोहित कुलकर्णी मंचावर होते. 

हेही वाचा : Rickshaw Driver Migration: रिक्षा, टॅक्सी चालकांचे धाबे दणाणले! मराठी अनिवार्यतेच्या निर्णयामुळे परप्रांतीय चालकांचे स्थलांतर; रिक्षानेच सुरू केला हजारो किमीचा प्रवास

सुरुवातीला सचिव प्रसाद ठोसर यांनी ट्रस्टच्या उपक्रमांची माहिती देताना सांगितले की, ट्रस्टने दोन वर्षांमध्ये महाराष्ट्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. पर्यावरण संवर्धनाचा भाग म्हणून राज्यातील सुमारे 10 शाळांना सौर ऊर्जा संच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सीमेवर तैनात असणाऱ्या भारतीय जवानांसोबत 'दिवाळी फराळ' उपक्रम राबवून कृतज्ञता व्यक्त केली आहे. प्राचीन मंदिरांचे पुनरुज्जीवन करून सांस्कृतिक ठेवा जतन करण्यासाठी ट्रस्टने विशेष पुढाकार घेतला आहे. महिला पोलीस, शेतकरी यांच्यासाठी केलेल्या कार्याचीही माहिती दिली.

डॉ. उदय कुलकर्णी पुढे म्हणाले, धर्म, नितिमत्ता, आध्यात्मिकता रुजवत असतानाच देशाचे रक्षण करणाऱ्या सीमेवरील सेनेचे मनोधैर्य वाढविण्यासाठी रावसाहेब ट्रस्टमार्फत होणारे कार्य स्पृहणीय आहे. समाज माध्यमांचा सकारात्मक उपयोग करून समाजोपयोगी कार्य कसे करता येते हे रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्टने प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे. द्वितीय वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त अफजल खानच्या वधावर आधारित 'गोष्ट इथे संपत नाही' हा बहुचर्चित कथाकथनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात होता. सारंग मांडके आणि सारंग भोईरकर यांनी उत्तम संवादकौशल्य आणि प्रभावी सादरीकरणातून इतिहासातील नकाशे, सनावळी आणि तपशीलांसह कथा उलगडत नेली. त्याला रसिकांची भरभरून प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी पितळे यांनी कले तर आभार चैताली फडके यांनी मानले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number