Karjat Local Crime: कर्जत लोकलमध्ये धक्कादायक प्रकार, सीटवर बसण्यावरून वाद, तरुणाने थेट चाकूच काढला अन्…

सीटवर बसण्याच्या वादातून लोकलमध्ये चाकूहल्ला झाला. कर्जत रेल्वे पोलिसांनी 12 तासांत तपास करून दोन आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Karjat Local Crime: कर्जत लोकलमध्ये धक्कादायक प्रकार, सीटवर बसण्यावरून वाद, तरुणाने थेट चाकूच काढला अन्…

Karjat Local Crime: सीटवर बसण्याच्या किरकोळ कारणावरून लोकल रेल्वेत प्रवाशावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून कर्जत रेल्वे पोलिसांनी अवघ्या 12 तासांत या प्रकरणाचा छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यातील आणखी एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सतीश कुमार बोलामनी पाठक (वय 26, रा. मस्जिद बंदर, मुंबई) हे गुरुवारी (11 जून) सकाळी सुमारे साडेसहा वाजता सीएसएमटी–खोपोली लोकलच्या लगेज डब्यातून प्रवास करत होते. वांगणी रेल्वे स्थानक पार झाल्यानंतर सीटवर बसण्याच्या कारणावरून त्यांचा काही तरुणांशी वाद झाला. सुरुवातीला हा वाद किरकोळ स्वरूपाचा वाटत असला तरी काही क्षणांतच तो तीव्र हाणामारीत रूपांतरित झाला.

हेही वाचा: Pranit More FIR News : स्टॅंडअप कॉमेडियन प्रणित मोरे महिला आयोगाच्या रडारवर; महाराष्ट्र साइबर सेलमध्येही FIR दाखल

या हाणामारीदरम्यान आरोपींपैकी काहींनी फिर्यादी पाठक यांच्यावर चाकूने वार करत गंभीर हल्ला केला. या हल्ल्यात ते जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर लोकलमधील प्रवाशांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली होती.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कर्जत रेल्वे पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. पोलीस उपनिरीक्षक प्रविण कड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे तपास पथकाने विविध ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. उल्हासनगर, शेलू, नेरळ तसेच नेरळ शहर परिसरातील कॅमेऱ्यांमधून आरोपींच्या हालचालींचा मागोवा घेण्यात आला.

तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपींची ओळख पटवली. त्यानंतर इब्रान इद्रिस अन्सारी (वय 18, रा. नेरळ) आणि करण कन्हैयालाल अग्रवाल (वय 22, रा. शेलू) यांना नेरळ येथील ममदापूर परिसरातून ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीनंतर दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा: Sangli Crime: सांगली हादरलं! घरात घुसून कुटुंबावर गोळीबार, 14 वर्षाच्या वेदांतला निर्घृणपणे संपवलं

दरम्यान, या गुन्ह्यातील आणखी एक आरोपी सिद्धार्थ गायकवाड (रा. नेरळ) हा सध्या फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. लवकरच त्यालाही अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या घटनेमुळे मुंबई लोकलमधील प्रवासाच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दररोज लाखो प्रवासी लोकलने प्रवास करतात. अशा परिस्थितीत किरकोळ कारणांवरून होणारे वाद थेट हिंसक वळण घेत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रेल्वे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारचा वाद टाळावा आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ रेल्वे पोलिसांना माहिती द्यावी. तपास वेगाने सुरू असून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number