जय महाराष्ट्र वेब न्यूज, नागपूर
एकीकडे पुण्यामध्ये स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत आहे तर विदर्भामध्ये ‘स्क्रब टायफस’ या आजाराचं संकट ओढावलं आहे. या आजारामुळे नागपुरात आतापर्यंत 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
शेतात काम करताना, गवतावर बसल्याने किंवा ट्रेकिंग करताना ‘ट्रॉम्बिक्युलिड माइट’ म्हणजे कीडे चावल्यामुळे काही जंतू पसरतात. हे कीडे माणसांना चावतात सुरुवातीला हे कळत नाही पण 10 ते 12 दिवसांनंतर त्याचा प्रभाव दिसायला लागतो.
हे कीडे चावल्यानंतर तिथे व्रण उठतात आणि ‘स्क्रब टायफस’ झाल्याचं समजतं धक्कादायक म्हणजे विदर्भात या आजाराचं वादळ घोंगावतंय आणि आत्तापर्यंत यामध्ये 5 रुग्णांचा बळी गेला आहे.
कसा पसरतो हा आजार