भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर सीव्ही रामन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी लावलेल्या रामन परिणामाच्या स्मरणार्थ, दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन भारतात साजरा केला जातो. यावर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन २०२३ ची थीम ’जागतिक कल्याणासाठी जागतिक विज्ञान’ अशी आहे. त्यामुळे यंदाच्या राष्ट्रीय विज्ञान दिन कृतीतून साजरा करून विज्ञानाची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील एसपीएम महाविद्यालयामध्ये या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आल आहे.
या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी भरघोस असा सहभाग नोंदवत आपले प्रकल्पही सादर केले आहेत. यातून शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाप्रती आपुलकी निर्माण होण्यास मदत झाली आहे. खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने हे विज्ञान प्रदर्शन राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे औचित्य साधून भरवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला वाव देण्यासाठी भरवलेल्या या विज्ञान प्रदर्शनामध्ये ११ शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.