गुरुवारपासून पुण्यातील शाळा सुरू

राज्यात १ डिसेंबरपासून पहिली ते सातवीचे वर्ग सुरू होणार होते. मात्र ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला. मात्र आता राज्यातील शाळा सुरू झाल्या असून गुरुवारपासून पुणे शहरातील पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पुण्यातील शाळा सुरू करण्याची तयारी सुरू झाली असून विद्यार्थी वर्गामध्ये मोठ्याप्रमाणात आनंदाचे चित्र […]

गुरुवारपासून पुण्यातील शाळा सुरू

राज्यात १ डिसेंबरपासून पहिली ते सातवीचे वर्ग सुरू होणार होते. मात्र ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला. मात्र आता राज्यातील शाळा सुरू झाल्या असून गुरुवारपासून पुणे शहरातील पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

पुण्यातील शाळा सुरू करण्याची तयारी सुरू झाली असून विद्यार्थी वर्गामध्ये मोठ्याप्रमाणात आनंदाचे चित्र पाहायला मिळत आहे. पुण्यातील शाळांमधील सर्व वर्ग सॅनिटाईझ केले जात आहेत. तसेच प्रशासनाने आखण्यात आलेल्या नियमावलीचे पालन करून पुण्यातील शाळांचे दार विद्यार्थ्यांसाठी गुरूवारपासून खुले करण्यात येणार आहे.

देशात ओमायक्रोनचा प्रादुर्भाव आल्यामुळे एक डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या शाळा स्थगित करण्यात आल्या होत्या, मात्र आता पुन्हा शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे दीड वर्षानंतर विद्यार्थी शाळेत येणार आहेत.

१५ डिसेंबरपासून परिस्थिती पाहून शाळा सुरू करण्याचा निर्णय पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घेतला होता. तसेच आता उद्यापासून कोरोना प्रतिबंधक नियम पाळत पुण्यातील पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा सुरू होणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number