आळंदीमधील शाळा होणार बंद? ‘या’ आजाराचा वाढला प्रादुर्भाव

पुणे जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून नवीन आजाराची साथ सुरु झाली आहे. ही साथ गंभीर होत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेची धावपळ सुरु झाली आहे. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आणि जिल्हा शल्य चिकित्सक साथ असलेल्या आळंदीत जाणार आहे. तसेच ही साथ आटोक्यात आली नाही तर शाळा बंद करण्याचा प्रस्ताव आरोग्य विभाग प्रशासनाला देणार आहे. चारच दिवसांत 1560 […]

आळंदीमधील शाळा होणार बंद? ‘या’ आजाराचा वाढला प्रादुर्भाव

पुणे जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून नवीन आजाराची साथ सुरु झाली आहे. ही साथ गंभीर होत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेची धावपळ सुरु झाली आहे. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आणि जिल्हा शल्य चिकित्सक साथ असलेल्या आळंदीत जाणार आहे. तसेच ही साथ आटोक्यात आली नाही तर शाळा बंद करण्याचा प्रस्ताव आरोग्य विभाग प्रशासनाला देणार आहे. चारच दिवसांत 1560 रुग्ण या साथीचे आढळले आहेत.

देवाची आळंदी शहरामध्ये डोळ्यांच्या बुबळांचा आजाराचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत चालल्याने आळंदी नगरपरिषदेसह पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरुवात करण्यात आली आहे. या आजाराचा प्रादुर्भाव प्रामुख्याने आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्थामध्ये प्रशिक्षण घेत असणाऱ्या आश्रमामध्ये प्रामुख्याने आढळून येत आहे. मागील ४ दिवसांमध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने वारंवार तपासणी केल्या जात असून यामध्ये १ हजार ५६० प्रकरणे आढळून आली आहे. दरवर्षीच पावसाळा सुरू झाल्यानंतर प्रादुर्भाव होणाऱ्या आजारांवर नियंत्रण ठेवण हे एक आरोग्य विभागासमोर मोठा आव्हान असतं

आळंदीत शाळकरी मुलांमध्ये आलेल्या साथीमुळे नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ व्हायरोलॉजी म्हणजेच NIV चे पथक आणि जिल्हा शल्य चिकित्सक घटनास्थळी जाणार आहे. या ठिकाणी पाहणी करुन निर्णय घेणार आहे. आरोग्य विभागाने या आजाराच पुढील उद्रेक टाळण्यासाठी सर्व खबरदारीच्या उपाययोजना सुरु केल्या आहेत.गरज पडल्यास शाळांना सुट्टी देखील दिली जाऊ शकते असे देखील सांगण्यात आले आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number