बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातही अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर शाळेची घंटा वाजली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील कोरोनामुक्त असलेल्या गावात तब्बल १९५ शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. बुलडाणा जिल्ह्यात एकूण २४३५ शाळा आहेत ज्यामध्ये जिल्हा परिषदेच्या १४३८ शाळा आहेत. यापैकी ज्या गावात मागील काही महिन्यांपासून एकही कोरोना रुग्ण आढळला नाही अशा गावात १९५ शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. यावेळी शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं होतं. तर शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना कोरोना नियमांचे धडे ही देण्यात आले होते.